Monday, May 1, 2023

घरबसल्या मोफत करा Aadhaar Card अपडेट! केवळ 15 मार्च ते 14 जून, 2023 पर्यंत संधी.

केंद्र सरकारने नागरिकांसाठी खास ऑफर आणली आहे. त्यानुसार, नागरिकांना त्यांचे आधारकार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करता येईल. त्यासाठी ऑफलाईन कागदपत्रे द्यावी लागतील.


 

जर तुम्ही आधार कार्ड मध्ये माहिती देताना अथवा ती भरताना चूक केली असेल तर ही चूक दुरुस्त करता येते. आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येते. या सुधारणेसाठी शुल्क आकारण्यात येते. पण केंद्र सरकारने Aadhaar Card Update करण्याची मोफत संधी दिली आहे. UIDAI ने नागरिकांना ही सवलत दिली आहे. त्यानुसार, धार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी मोफत संधी देण्यात आली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तर आधार केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

 

UIDAI ने नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन आधार कार्ड अपडेटची सुविधा दिली आहे. आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल केल्यास, त्यासाठी तुम्हाला एक छद्दामही द्यावा लागणार नाही. 15 मार्च ते 14 जून, 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येणार आहे. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. UIDAI ने 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

 

UIDAI च्या डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत myAadhaar पोर्टलवर तुम्हाला मोफत आधारकार्ड अपडेट करता येईल. कागदपत्रे अपलोड करता येईल.

 

तुम्ही आधारा कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

 

     1.  आधार कार्डमध्ये ऑनलाईन नावात बदल करण्यासाठी ओळखपत्राची स्कॅन कॉपी लागते.

     2. जन्मतारीख अपडेट करण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची स्कॅन कॉपीची गरज पडते.

     3. लिंग बदलाविषयी कोणतेही कागदपत्रे द्यावे लागत नाही.

 

असे करा आधार कार्ड अपडेट

     1. UIDAI च्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जा.

     2. https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा.

     3. तुमचा 12 अंकांचा आधारा कार्ड क्रमांक आणि Captcha कोड टाका.

     4. OTP पाठविण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर पुढील प्रक्रिया करा.

     5. आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा OTP येईल.

     6. OTP टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा.

     7. ‘Proceed to update Aadhar’ हा पर्याय निवडा, माहिती भरा.

धन्यवाद . . .


पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना Share
 करा आणि ब्लॉग ला Follow करा.


Whatsapp Group Join करण्यासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/Bhn7Yn4xP84FpFM8PkLbWl



Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक -
 https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105


2 comments:

  1. खुप छाण आहे माहिती

    ReplyDelete
  2. अजून नवीन नवीन information घेऊन येतोय तुमच्या साठी

    ReplyDelete

Shopkeepers refuse to accept 2000 notes? Complaint Here | दुकानदार 2000 ची नोट घेण्यास टाळाटाळ करत आहेत? मग थेट येथे तक्रार करा |

          Super Sachya | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने दिलेल्या निर्णयानुसार, ज्यांच्या आपल्या चलनामध्ये २००० रुपयांची नोटे आहेत, त...